Aurangabad News Update : मृत्यू नंतरही समस्या जेंव्हा पाठ सोडत नाहीत…

मनिषा पाटील | सोयगाव : अल्पशा आजाराने एका महीलेचा शेतात मृत्यु झाला झाल्यानंतर मृतदेह गावात आणण्यासाठी मुसळधार पावसामुळे तब्बल आठ तास लागले. गावातील काही तरुणांच्या मदतीने मृतदेह गावानजीकच्या दफनभूमीत आणल्यानंतर या महिलेच्या पर्थिवावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोयगाव तालुक्यातील तिडका येथे ही घटना घडली.
तिडका येथील अकबर शहा हे आपल्या कुटुंबा सोबत गावापासून दोन की.मी.अतंरावर असलेल्या शेतातच वास्तव्यास आहेत. अकबर शहा यांची पत्नी हापीजा शहा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या दफनविधी गावानजीकच्या कब्रस्थानात करायचा होता परंतु तिडकासह परीसरात सायंकाळच्या सात वाजेपासुन जोरदार पाऊस सुरू असल्याने या भागातील नदी नाल्यांना मोठा पुर आल्यामुळे या महिलेचा मृतदेह दफनभूमी आणण्यासाठी मोठी अडचण आली. अखेर तब्बल आठ तासानंतर गावातील एम.आय.एम.तालुका अध्यक्ष शेख रईस शेख रशीद,अमीर हसन पठान,अफजल खान मोहम्मद,जमीर हारून पटेल,राजू मस्ताना पटेल,आशु मजीद पटेल यांच्या मदतीने मृतदेह गावात आणून दफनविधी करण्यात आला.