Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : संजय केणेकर यांच्यासह ५ जणांची भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती …

Spread the love

मुंबई :  महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी गुरुवारी पाच प्रदेश सरचिटणीसांची नियुक्ती केली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली आहे. यामध्ये संजय केणेकर (औरंगाबाद), अधिवक्ता माधवी नाईक (ठाणे), विक्रांत पाटील (रायगड), रणधीर सावरकर (अकोला) आणि मुरलीधर मोहळ (पुणे) यांचा समावेश आहे.


BJPNewsUpdate: बावनकुळे यांनी सर्व खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, संघटना मंत्री, पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना सांगितले की, वरील नियुक्तीची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. औरंगाबादेतून संजय केणेकर यांना राज्य कार्यकारिणीवर सरचिटणीसपदी स्थान दिल्याने एका प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षाकडून न्याय मिळाला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल संजय केणेकर यांनी पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

संजय सिरसाट यांचा माध्यमांविरुद्ध कारवाईचा इशारा …

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाण्यातील नऊ विभागप्रमुखांच्या याद्या जाहीर केल्यानंतर आता बंडखोर शिंदे गटाचे नेते व उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पण नेत्यांच्या काय, पण उपनेत्यांच्या यादीतही संजय शिरसाट यांना स्थान दिलेले नाही. यापूर्वी मंत्रीपदाच्या यादीतूनही संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे नेतेपदही नाही आणि मंत्रीपदही नाही अशी अवस्था संजय शिरसाट यांची झाली आहे. मात्र  आपण नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक देण्यात असून यापुढे अशा बातम्या दिल्यास मानहानीचे दावे दाखल करण्याचा इशारा आमदार संजय सिरसाट यांनी दिला आहे.

 

BJPNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!