Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : भुमरेंनी जावयाला कंत्राट दिल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप तर अब्दुल सत्तार यांच्याकडून भुमरेंची पाठराखण…

Spread the love

औरंगाबाद : रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट भुमरे यांच्या जावाई यांना मिळाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याच्याकडून भुमरे यांच्या जावाई यांनी रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान भुमरे यांनी दानवे यांचे आरोप फेटाळले असले तरी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र भुमरे यांची पाठराखण केली आहे.


या विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे कि , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नुकत्याच झालेल्या पैठण दौऱ्यात या कामाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे याच कामाची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केलेली असून त्या कामांना सुरवात देखील झाली आहे. तर भुमरे यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र या योजनेचे कंत्राटदार कोण? तर ते भुमरे यांचे जावाई असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

ज्या कंत्राटदाराला काम मिळाले होते, त्याच्याकडून भुमरे यांच्या जावयाने रीतसर खरेदीखत केलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारे कंत्राटच खरेदीखत करता येत नसते. असे असतांना मंत्री भुमरे यांचे जावाई यांनी औरंगाबाद येथील रजिस्ट्री कार्यालयात संबधित कंत्राटदाराकडून कंत्राट रीतसर खरेदीखत करून घेतले आहे. हा प्रकार खूप गंभीरअसून, याची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

भुमरेंनी मात्र आरोप फेटाळले…

दरम्यान अंबादास दानवे यांनी केलेले आरोप  भुमरे यांनी फेटाळून लावले असून असा कुठलाही प्रकार झाला असल्याचं दानवे यांनी दाखवून द्यावे, त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. या कामाचे अजून टेंडर निघाले नाही, त्यामुळे आरोपात काहीही तथ्य नसल्याच भुमरे यांनी म्हटले आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही या वादात उडी घेत संदीपान भुमरे यांची पाठराखण करताना , भुमरेंच्या जावयाला कंत्राट मिळाले तर त्यात वावगे काय आहे? त्यांनी काम घेऊ नये का? असा प्रतिप्रश्न उपस्थित करीत काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे, पण जावयाला कंत्राट मिळाले म्हणून आक्षेप घेण्यात काय अर्थ? असा सवालही उपस्थित केला.

एखादी व्यक्ती फक्त ती राजकारण्याची किंवा मंत्र्याची नातेवाईक आहे म्हणून त्याला कंत्राट मिळू नये का? त्यांनी कामच करू नये असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे? संबंधित कंत्राटदार कुणाचा जावई आहे हे पाहण्यापेक्षा त्याने केलेले काम उत्तम दर्जाचे कसे होईल हे बघितले पाहिजे, असा टोला देखील सत्तार यांनी दानवे यांना लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!