Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAssemblyUpdate : मुख्यमंत्र्यांनी “प्रेम, करुणा, दया” हे शब्द उच्चारले आणि सत्ताधारी हसू लागले … !!

Spread the love

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या मदारांनी एकमेकांची खेचाखेची करण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळी नेहमीप्रमाणे अजितदादा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच शेरेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे  यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याची आज चर्चा झाली.


राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  “तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर ‘करुणा’ दाखवली असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले कि , “धनंजय मुंडे ही तिकडे किती ओरडत होते. ते एवढ्या जोरात ओरडत होते की जसे मूळचे शिवसैनिक वाटत होते. तुमचा घसा खराब होईपर्यंत ओरडला. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळे हे झाले. पण ती परत-परत ती दाखवता येणार नाही.”

मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या बोलण्यामध्ये ‘करुणा’ हा शब्द आल्यानेच सभागृहातील सत्ताधारी सदस्यांमध्ये हास्याची उधळण झाली. धनंजय मुंडे आज मुख्यमंत्र्यांचे मुख्य टार्गेट होते कारण  विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर धनंजय मुंडेंनी भाजप आणि शिंदे गटाला उपरोधिक टोले लगावले होते. हे लक्षात ठेवून त्यांचा रोख पूर्णतः धंनजय मुंडे यांच्याकडे होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!