Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaControversyUpdate : शिवसेनेच्या सुनावणीसाठी पुन्हा …तारीख पे तारीख !!

Spread the love

मुंबई : संपूर्ण राज्याचे आणि देशातील राजकारणच्यांचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेशी संबंधित याचिकांवर होणारी सुनावणी उद्या होईल कि नाही याविषयी अनिश्चितता  असल्याचे वृत्त आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राचे कामकाज उद्याच्या यादीत समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी उद्या होण्याची शक्यता देखील अद्याप दिसत नाही. त्यामुळे वाडी आणि प्रतिवादी यांच्यासाठी सध्या तरी “तारीख पे तारीख , तारीख पे तारीख …” असे म्हणण्याची वेळ आली आहे. 


क्वचितच वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे सुनावणी उद्या होणार नसल्याची वकिलांमध्ये चर्चा आहे. या आधी 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती. त्यानंतर ती पुढे जाऊन मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्याही ही सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील महत्वपूर्ण असणारी हि सुनावणी आधीच सातत्याने पुढे गेली आहे. दरम्यान सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे चित्र अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही.

खरी शिवसेना कुणाची ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करीत दोन तृतीयांश आमदार आणि खासदारही आपल्यासोबत नेऊन भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकारही स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर खरी शिवसेना कुणाची ? या विषयावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला असून शिंदे यांच्या बंडखोर गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आपला असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. केला आहे. या विषयावर तत्काळ कार्यवाही करीत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पात्र दिले आहे दरम्यान आवश्यक त्या  कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने  चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगाने  दोन आठवड्यांचाच वेळ दिला असून त्याची मुदत उद्या, २३ऑगस्टला संपत आहे.

विषय असा आहे ….

दरम्यान सरन्यायाधीशांनी आधीच्या सुनावणीत सूतोवाच केल्याप्रमाणे हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणं, खरी शिवसेना कोणाची, तसंच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होईल. यावर कोणताही निर्णय झाला तर तो ऐतिहासिक होईल असे म्हटले जात आहे.

काल होणारी हि सुनावणी त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात येत होते त्यामुळे कदाचित २३ रोजी हि सुनावणी होईल असे म्हटले जात होते परंतु  आजच्या कामकाजाच्या यादीत या खटल्याचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे उद्या ऐवजी आता हि  सुनावणी कधी होईल हे अद्याप स्पष्ट नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिले आहे. बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने याचिकेद्वारे  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेलाही  शिवसेनेने आव्हान दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!