Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : नामांतराचा निर्णय फिरवताच संजय राऊत संतापले

Spread the love

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधीचे ठाकरे सरकारने  घेतलेले निर्णय रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी  हे वृत्त जर खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका केली आहे.

यावर आपली प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले कि , महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. याबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचं खरं असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.

देवेंद्र फडणीस याना विचारावे लागेल …

“हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, कारण याबद्दलचा निर्णय़ सुप्रीम कोर्टात व्हायचा आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पुढे  म्हणाले की, “ हे निर्णय बदलून काय साध्य केलं हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? मला वाटतं हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार असल्याने त्यांचा मेंदू बधिर झाला आहे. त्यांना काम करावंसं वाटत नाही आहे, त्यामुळे स्थगिती देत आहेत. पण स्थगिती देतानाही यांनी आपला विवेक हरवला आहे”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!