AurangabadCrimeUpdate : चांदी लुटणारे गुन्हेशाखेकडून अटकेत, दोन फरार

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी माळीवाड्याजवळ पाठलाग करंत एअरगन चा धाक दाखवून चांदी विक्रेत्याची ८कि.चांदी लंपास करणार्या तिघांना गुन्हेशाखेने अटक केली. या प्रकरणी ३जुलै रोजी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शरद पवार(३०) धंदा सोनार,रा.गंधेश्वर ता.कन्नड,प्रविण पवार (३२) , नंदकुमार निळे (३५) दोघेही रा.शरणापूर,अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर गुड्डू आरण घोडेगाव, आनंद राजपूत रा.बिडकीन हे दोघे फरार आहेत. वरील आरोपींनी नितीन घाडगेरा.फुलंब्री या चांदीचा ठोक व्यापार्याला पाठलाग करुन लुबाडले.घटनास्थळीचे सी.सी. टि.व्ही. फुटेज तपासल्यानंतर संशयित आरोपी पांढर्या कार जवळ फिरतांना दिसले. ही कार आसेगाव येथील सोनार शरद पवार याची निघाली. संशयावरुन एपीआय मनोज शिंदे यांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्हा उघडकीस आला.त्याने ओळखीच्या चार इसमांना सुपारी देत लुटमार केल्याचे गुन्हेशाखेच्या तपासात उघंड झाले.दुसरा आरोपी नंदकुमार निळे याच्या घरातून ८कि.८८०ग्रॅम चांदी जप्त करंत आरोपी अटक केले.
या गुन्ह्याचा तपास दौलताबाद पोलिस करंत असतांना गुन्हेशाखाही करंत होती. वरील कारवाई पोलिस उपायुक्त उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, एपीआय मनोज शिंदे, पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे चंद्रकांत गवळी,भगवान शिलोटे, विशाल पाटील, नितीन देशमुख यांनी पार पाडली.या प्रकरणी सर्व आरोपींना दौलताबाद पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे