AurangabadCrimeUpdate : वाढदिवसात तलवारीने तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

औरंगाबाद : वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवार घेऊन आलेल्या टोळक्याला विरोध केल्याने त्यांनी तरुणावर जीवघेणा हल्ला करून तलवारीने मानेवर आणि पार्श्वभागावर वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार ४ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विजयनगरात घडला. शुभम राजहंस सोनवणे (२१, रा. सिद्धार्थनगर, एन-१२, हडको) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
विजयनगरात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमात आरोपी ऋषिकेश पालोदकर, कुणाल पहाडे आणि अन्य पाच ते सहाजण तलवार घेऊन आले. त्यांना शुभम याने विरोध केला. त्यावरून शुभमवर आरोपीनी तलवारीने मानेवर व पार्श्वभागावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद तीन महिलांसह चौघांचा धिंगाणा
औरंगाबाद : हॉटेलच्या पार्किंगमध्ये मद्यधुंद तीन महिलांसह एकाने आरडाओरड करून धिंगाणा घातला. हा प्रकार ७ जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एपीआय कॉर्नर भागातील हॉटेल शांग्रीला येथे घडला. पोलीस शिपाई कृष्णा गायके हे रात्री गस्तीवर असताना ११२ क्रमांकावर हॉटेल बाहेर गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. तिथे गेल्यावर तीन महिला व एकजण आरडाओरड करताना आढळून आले. महिला देखील मद्यधुंद असल्याने मुकुंदवाडी ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. चौघांना ताब्यात घेऊन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसांनी मिळवून दिले १ लाख रुपये
औरंगाबाद- एनिडेस्क एप डाऊनलोड करायला लावून सायबर ठकांनी १ लाख ६ हजार रुपायांना गंडवल्या नंतर सायबर पोलिसांनी तत्परतेने भामटयांचे इ वोल्ट फ्रीझ करून भाजी विक्रेत्याला १ लाख ६ हजार रु परत मिळवून दिले
रतन गुजर व प्रकाश काथार असे फिर्यादीचे नाव आहे.
या दोघांना केवायसी पूर्ण करण्यासाठी भामटयांनी बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून .फिर्यादींना एनिडेस्क हे ऐप डाऊनलोड करायला लावून त्यांच्या डेबिटकार्ड ची माहिती घेत गंडा घातला फिर्यादींनी पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे तक्रार केली पातारे यांनी आदेश देताच भामटयांचे ए वोल्ट फ्रीझ करवून फिर्यादीचे रुपये पार्ट मिळवून दिले या प्रकरणी पोलीस कर्मचारी वैभव वाघचौरे, सुशांत शेळके यांनी महत्व पूर्ण भूमिका बजावली. फिर्यादी रतन गुजर यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येत सायबर पोलिसांचे आभार मानले