Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DevendraFadanvisNewsUpdate : भाजप नेतृत्वावर ब्राह्मण महासंघ खवळला…

फोटो सौजन्य : इंडिया डॉट कॉम

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : महाराष्ट्रातील सत्तांतरात भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद न देता त्यांची उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आल्यामुळे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यामुळे ब्राह्मण महासंघाने सोशल मीडियावर भाजपच्या या निर्णयावर नाराजी दाखवली आहे. 

Advertisements

दरम्यान नव्या सरकारमध्ये भाजपकडून पुन्हा एकदा  देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असे अंदाज वर्तविले जात असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून ब्राह्मण समाजाचे खच्चीकरण केले गेले असा आरोप ब्राह्मण महासंघाने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Advertisements
Advertisements

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत आहे. प्रारंभी पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून  हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचे चारित्र्य हनन करून त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड रोखण्यासाठी बहुमतापेक्षा अधिक संख्येने युतीचे आमदार निवडून आणल्यानंतरही सरकार न बनविण्याचं षडयंत्र आखण्यात आले आणि योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.”

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी बळजबरीचा आग्रह…

डॉ. गोविंद कुलकर्णी  पुढे म्हटले आहे कि , “आत्ता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत पोहचविले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. तरीही  देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविले. त्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. यातून देवेंद्र फडणवीस यांचे  खच्चीकरण करण्यात आले. ”

दरम्यान भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचे  खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालले आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचेही  कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!