AurangabadNewsUpdate : सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेची आत्महत्या

औरंगाबाद : पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने आज दुपारी ३.१८ वा.सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आश्विनी कुणाल देहाडे (१९) रा.वाल्मीनाका सैनिकविहार अपार्टमेंटफ्लॅट नंबर २१ असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा पती कुणाल देहाडे लघुउद्योजक आहेत.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आश्विनी हिने अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली.त्या ठिकाणी उपस्थित असलेले केशव सोनवणे यांनी अश्विनी ला गंभीर अवस्थेत कमलनयन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डाॅक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिस ठाण्याचे एपीआय तपास करंत आहेत.