AurangabadNewsUpdate : पोलीस नाईक सुभाष आगे यांचा सेवागौरव सोहळा….

मनिषा पाटील / सोयगाव : सोयगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस नाईक सुभाष रामदास आगे हे दि. ३१ मे मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सोयगाव पोलीस स्टेशन येथे निरोप देण्यात आला.
यावेळी आयोजित निरोप समारंभात बोलताना सुभाष आज म्हणाले कि, मी आज निवृत्त होत असल्याचे यांना आपल्या सहकार्याच्या सोबत तेरा वर्षे आठ महिने पोलीस दलात सेवा केल्यावर हि आनंद होत आहे.परंतु मी दि.३१ मे मंगळवार सोयगाव येथे सेवा निवृत्त होत असल्याने मला दु:खही होत आहे.
पोलीस नाईक सुभाष आगे यांनी आर्मी दलात दि.२३/३/१९८४ ते दि.३१/३/२००६ पर्यंत २२ वर्ष सेवा करून पुन्हा दि.३०/९/२००८ ते ३१/५/२०२२ पर्यंत १३ वर्ष ८ महिने या कालावधीत पोलीस दलात सेवा केली. यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पोलीस नाईक सुभाष आगे यांचा शाल,फुलगुच्छ व श्रीफळ देवून सपत्नीक सत्कार केला. तसेच याच कार्यक्रमात सोयगाव पोलीस स्टेशन येथून बदली होऊन चाललेले पोलीस कर्मचारी , सोयगाव पोलीस स्टेशनला नवीन आलेले महिला पोलीस कर्मचारी यांचाही फुलगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे,पोलीस उपनिरिक्षक रंजीत कासले,पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडीत,विजय पाटील,रविंद्र मस्के,चन्द्रकांत दौड,संतोष पाईकराव,ज्ञानेश्वर सरताळे,राजू निवृत्ती बर्डे,राजू मोसम बरडे,संदीप सुसर, सुहास पाटील,दीपक भंगाळे,मिर्झा सर,श्रीकांत तळेगावे, रवींद्र तायडे,गणेश रोकडे,सादीक तडवी,विनोद सपकाळ, प्रदीप पवार,सागर गायकवाड, शिवदास गोपाळ,विनोद कोळी,विकास दुबेले,कौतिक सपकाळ,अजय कोळी,सुके सर,भाग्यश्री चव्हाण,कविता कांदे,प्रिंयंका बोडखे,कविता मिस्त्री,होमगार्ड योगेश बोखारे,किरण सपकाळ,सागर राऊत, संतोष घनगाव,विशाल घन आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तायडे यांनी तर पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडीत यांनी आभार मानले.