AurangabadCrimeUpdate : अवैध गॅस रिफिलिंग, ६अटक २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – छावणी आणि बेगमपुरा पोलिसांच्या रडारवर अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणारे आले असून काल दिवसभरात ६अटक केले असून२६लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
छावणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमधे सय्यद मुजीब, शहारुख अन्वर कुरेशी, साहिल पठाण (१७) इश्वर घायतडक(२७) सर्व रा.पडेगाव,किशोर खरात रा.उस्मानपुरा यांचा समावेश आहे.तर बेगमपुरा पोलिसांनी जयसिंग पुर्यातून शेख सलमान शेख पाशा(३०) याला गॅस रिफीलिंग करतांना अटक केली.
वरील दोन्ही गुन्ह्यात पोलिसांनीच फिर्यादी होत गुन्हे दाखल केलेले आहेत.
आरोपींकडून वजन काटे, विद्यूत मोटारी, भरलेले व रिकामे सिलेंडर, याची वाहतूक करणारी रिक्षा असा एकूण २६लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक शरद इंगळे, प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनोद भालेराव,व छावणी पोलिसांनी पार पाडली