AurangabadNewsUpdate : ३१ मे रोजी औरंगाबाद शहरात पेट्रोल खरेदी नाही : अखिल अब्बास

औरंगाबाद : गेल्या ५वर्षांपासून पेंट्रोलपंपचालकांना पेट्रोल कंपन्यांकडून वाढीव कमिशन मिळंत नसल्याच्या निषेधार्थ शहरातील पेट्रोलपंपधारक ३१ मे रोजी पेट्रोल खरेदी करणार नसल्याचे निवेदन पेट्रोलपंप असोशिएशन ने जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना दिले. त्यामुळे ३१मे रोजी शहरात पेट्रोलचा तुटवडा नागरिकांना जाणवू शकतो.
राज्यातील पेट्रोल असोशिएशन ने यापूर्वी कंपन्यांकडे २०१७साला पासून पंपचालकांना वाढीव कमिशनन मिळाल्याचा पत्रव्यवहार केलेला आहे.पण याची दखल घेण्यात न आल्याच्या निषेधार्थ शहरातील पंपचालकांनी वरील निर्णय घेतल्याचे असोशिएशन चे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले