AurangabadCrimeUpdate : घरगुती वादातून वडलांकडून मुलावर चाकू हल्ला, आरोपी फरार

औरंगाबाद – विवाहित बहीणीची बदनामी करणार्या वडलांना समज देणार्या मुलाला वडलांनी भर रस्त्यात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात वडलांविरुध्द अजामिन पात्र गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
सय्यद अल्तमश सय्यद अन्वर(२०) रा.आरेफ काॅलनी असे जखमी चे नाव आहे. तर मो.मश्कुर मो.उस्मान असे आरोपी वडलांचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री आरोपी मो. मश्कुर याने चेलीपुरा येथील मंगलम बारच्या बाहेर सावत्र मुलगा सय्यद अल्तमशला चाकूने मारहाण करंत तुकडे करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सय्यद अल्तमश याच्या विवाहित बहीणीची त्याचे सावत्र वडिल नातेवाईकांमधे बदनामी करत होते. म्हणून अल्तमश ने २ मे रोजी वडिलांना फोन करुन तर १० मे रोजी प्रत्यक्ष भेटून आई समक्ष बहीणीची बदनामी न करण्याविषयी सांगितले. याचा राग मनात धरुन आरोपी मो मश्कुर यांनी एका साथीदाराला सोबंत घेतअल्तमशचा माग काढला दरम्यान अल्तमश मित्रासोबंत मद्यपान करण्यास चेलीपुरा परिसरात गेल्याचे कळताच मो.मश्कुर ने अल्तमश वर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पुढील तपास पीएसआय हिवराळे करंत आहेत