AurangabadNewsUpdate : औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अन आठवड्याला पाणी , नागरिकांचा संताप…

औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी आणि आठवड्याला पाणी अशा अवस्थेत आहे अशी प्रतिक्रिया समाजवादी जनपरिषद महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी राठवाड्यातील प्रश्नांकडे कसे बघतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा प्रश्न असल्याचे श्री ढोबळे यांनी म्हटले आहे .
मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांना नियमित दररोज पाणीपुरवठा करणारी शासन व्यवस्था औरंगाबादच्या संदर्भात मात्र आपली प्रशासकीय दिवाळखोरी मागील अनेक वर्ष राजरोसपणे चालवत शहरातील नागरिकांना पाण्याच्या मूलभूत अधिकारापासून आठवडा आठवडा वंचित ठेवत आहे . पाणी वितरणाचे हे धोरण संतापजनक आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना सतत आधार देणाऱ्या औरंगाबादकरांना हक्काचे नियमित पाणी मिळू नये ही मराठवाडा विकासाची शोकांतिका असल्याचे अॅड. विष्णू ढोबळे यांनी म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य मराठवाड्यात दुय्यम वागणूक देत असल्यामुळे आर्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सिंचन इत्यादी क्षेत्रातील अनुशेष प्रचंड वाढला आहे . औरंगाबाद शेजारी
जायकवाडी धरण असताना शहराच्या विकासासंदर्भातील पाणी नियोजनाचे पार धिंडवडे निघाले आहे. शासनाने शहरास दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी मागणीही सजप चे प्रदेशाध्यक्ष ढोबळे यांनी केली आहे