AurangabadNewsUpdate : सोयगावच्या आरोग्य मेळाव्यात रुग्णांचा मोठा प्रतिसाद

मनिषा पाटील । औरंगाबाद : सोयगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय सोयगावच्या वतीने भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोयगाव शहरातील तज्ञ डॉक्टरांकडून शहरासह तालुक्यातील रुग्णांनी विविध तपासण्या करून उपचार करून घेतले असून रुग्णांना मोफत शिबिराचा लाभ घेतला आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळावा सोयगाव ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित केला होता. या शिबिराचे उद्घाटन सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा)काळे यांच्या हस्ते करण्यात आले तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सोयगाव नगरपंचायत नगराध्यक्षा आशाबी तडवी हे होते.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा स्तरावरुन वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एम.कुलकर्णी,वैद्यकीय अधीक्षक वर्ग -१ सोयगाव डॉ.शंकर कसबे,सोयगाव तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे,पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,समाजप्रबोधनकार विष्णु मापारी, सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित,नायब तहसीलदार व्ही.टी.जाधव,नगरसेवक गजानन कुडके व रुग्ण क.समिती सदस्य नंदू भाऊ हजारी,तसेच पंचायत समिती सदस्य माजी संजीवन सोनवणे,दिलीप देसाई,व जिल्हा स्तरावरील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण ७३६ रुग्णांची तपासणी करून १२६ रुग्णांना डिजिटल हेल्थ कार्ड काढण्यात आले. यामध्ये प्राधान्याने २०३ नेत्र रुग्णाची तपासणी करुण एकूण तसेच ५२ परिपक्व मोतोबिंदू रुग्णांचे निदान करण्यात आले, तसेच ४८ बाल रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले,दत्तरोग-, नाक रक्त तपासणी-३५, त्वचारोग-३९१, ई.सी.सी.-३५, एक्स-रे-२०, रक्त तपासणी-३१६,आयुष्य-८५ व हदय रोग-१२,या शिबिरामध्ये स्त्री रुग्णांची,गरोदर मातांची तपासणी, अस्थीरोग हाडांचे विकार तपासणी, विकलांग रुग्णांची तपासणी अशा अनेक रोग निदान उपचार संदर्भात सेवा केली,व इतर रुग्णांना तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी व औषधी उपचार करण्यात आले.या आरोग्य मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सोयगावचे सर्व अधिकार व कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले अशी माहिती सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकर कसबे यांनी दिली.