Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूला आता विदेशी दारूचा दर्जा, राज्य शासनाचा निर्णय निर्णय

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मोहफुलांच्या दारुला विदेशी मद्याचा दर्जा, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोला मंजुरी तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय आदी महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये विशेषतः विदर्भात मोहाच्या फुलाचे उत्पादन मोठे असून यापासून तयार होणारी दारू ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय आहे. आतापर्यंत या दारूची गणना अवैध दारू मध्ये होत होती. 

काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारुचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारु आता विदेशी दारुच्या दुकानात मिळणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून पुणेकरांना मोठी गुडन्यूज मिळाली आहे. कारण स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील ७ महत्त्वाचे निर्णय

1. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता

2. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय

3. मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील 30 वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय

4. तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय

5. पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता

6. काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय

7. महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!