Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : एक तर्फी प्रेमातून मित्राचा खून, आरोपीला चार वर्षांनी जन्मठेप व ५० हजार रु.दंड

Spread the love

औरंगाबाद – तरुणीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या इसमाने मित्राचा गळा आवळून खून केल्यानंतरतब्बल ४वर्षांनी आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधिश रामगडिया यांनी जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी उत्कृष्ट तपास करुन आरोपीविरुध्द कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते.

मंगेश सुदाम वायाळ(२७) रा.समसापूर ता.जि.परभणी असे खुन्याचे नाव आहे.तर अजय शत्रुघ्न तिडकेरा. शहापूर ता. खामगाव जि.बुलढाणा असे मयताचे नाव आहे. त्याने ५एप्रिल २०१८ रोजी पहाटे ४.३०वा. अजयचा त्याच्या मैत्रीणीच्या कारणावरुन गळा आवळून खून केला.व त्याच्या रुम पार्टनरला याची माहिती देऊन पोलिसांसमोर हजर होत असल्याचे सांगून निघून गेला होता.आरोपी मंगेश वायाळ व मयत अजय तिडके हे दोघे शिक्षणासाठी औरंगाबादेत एकाच खोलीत राहात होते.

दोघेही मिलींद विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत होते पण अजयची  एका तरुणीशी जवळीक वाढल्यानंतर त्याने बेगमपुर्‍यातील पहाडसिंगपुरा येथे दुसर्‍या मित्रांसोबंत राहायला गेला. त्या ठिकाणी आरोपी मंगेश वायाळ हा ४ एप्रिल रोजी मुक्कामाला अजय च्या खोलीवर आला. अजय सोबंत असलेले त्याचे दोन मित्र त्यांना शेजारी झोपण्यासाठी जाण्याची विनंती करंत अजय शी काही महत्वाचे बोलायचे आहे असे कारण सांगितले व ५ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा. खून करुन निघून गेला.

दरम्यान मयत अजय चे वडिल शत्रूघ्न तिडके यांना बेगमपुरा पोलिसांनी अजयचा खून झाल्याची माहिती दिली.त्यांनी शहापूर हून शहरात येत खून कसा झाला याची माहिती मयत अजयच्या रुम पार्टनर कडून घेतली. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी आरोपीला अटक करुन दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात पोलिस कर्मचारी देवा सलामपुरे,पीएसआय विवेक जाधव, भागवत मुठाल, शेख साबेर यांनी सहभाग नोंदवला हौता.
.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!