Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सूड भावनेतून माझ्या पतीविरुद्ध पोलिसांकडून कारवाई : जयश्री पाटील

Spread the love

मुंबई : सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ला प्रकरणाला जबाबदार धरून  एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यातघेतले आहे . या अटकेनंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आपल्या पतीच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करीत, सूड भावनेतून पोलीस माझ्या पतीवर कारवाई करीत असल्याचे म्हटले आहे. गावदेवी पोलीस ठाण्यासमोर आपला आक्रोश व्यक्त केला. आपल्या मुलांसह जयश्री पाटील पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. 

आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनतर सरकारी कामात अडथळा आणणे आणि कर्मचाऱ्यांना भडकावल्याच्या आरोपावरून आता मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा घरात घुसल्याचा आरोप वकील जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या, अनिल देशमुखांना जेलमध्ये पाठवलं, त्याचा बदला शरद पवार घेत आहेत. पोलीस घरी चौकशी आले. चौकशीला आम्ही तयार होतो. कर नाही त्याला डर कशाला!. मी कपडे बदलत असताना महिला पोलीस माझ्या बेडरूममध्ये घुसल्या. माझ्या कुटुंबाला धोका आहे.

सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील आपल्या तान्ह्या बाळासह आणि १० वर्षीय मुलगी झेन गावदेवी पोलीस ठाण्यात हजर आहेत. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस दादागिरी करत असून शरद पवारांचा दबाव आहे. मुंबई पोलिसांकडून देखील आमच्या कुटुंबाला धोका आहे. तर १० वर्षीय झेन सदावर्ते यांनी देखील वडील नात्याने मुलीला भेटू देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!