AurangabadNewsUpdate : रेल्वेतून पडून मायलेकींचा करुण अंत , अपघात कि आत्महत्या ? पोलीस करीत आहेत चौकशी…

औरंगाबाद : औरंगाबादपासून लासुर पोटूळ रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी 86/4-5 मध्ये एक महिला वय 24 अंदाजे व लहान मुलगी 3 वर्ष अंदाजे धावत्या रेल्वेतून पडून एक महिला आणि लहान मुलीचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मयत महिलेच्या पर्समध्ये आढळलेल्या मोबाईलवरून मयत मायलेकींची ओळख पटली असून सदर मयत महिलेचे नाव पूनम गणेश विसपुते , वय अंदाजे 24 तर तिच्यासोबत असणाऱ्या बालिकेचे नाव शंभवी गणेश विसपुते वय ३ वर्षे असे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मयत नवसारी मयत महिला गुजरात येथील रहिवासी असून सध्या ती नाथनगर, बालाजीनगर येथे राहत होती. तिच्याजवळ असलेल्या मोबाईलची तपासणी केली असताना मयत महिलेने आपल्या भावाला ”आपण आत्महत्या करीत असल्या”चा मॅसेज पाठवल्याचे दिसून आले. सदर मायलेकींचा मृतदेह पाहताच या भागातील रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांनी ही माहिती शिल्लेगाव पोलिसांना दिली.
याबाबत माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन या मायलेकींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लासुर स्टेशन येथील सरकारी दवाखान्यात पाठवला असता तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून या दोघीही मायलेकींनी मृत घोषित केले. मोबाईलमधून मिळालेल्या नंबरवरून पोलिसांनी पूनम विसपुते हिच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देताच तिचे नातेवाईक रुग्णालयात घटनास्थळी हजर झाले. दरम्यान तिने हि आत्महत्या का केली ? तिच्यासोबत कोणी होते का ? हि आत्महत्याच आहे कि आणखी काही ? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.