Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सराईत गुन्हेगारासोबत वाटमारी करणाऱ्या बडतर्फ पोलिसाला अटक

Spread the love

औरंगाबाद – शहर पोलीस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी आणि सराईत गुन्हेगाराने युती करत वाटमारी सुरु केल्या नंतर गुन्हे शाखेने मध्यवर्ती बसस्थानकातून त्याला अटक केली. कुंदन ठाकूर असे बडतर्फ पॉलस कर्मचार्याचे नाव आहे, तो काही काळ हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तेथे त्याची ओळख कुख्यात रईस बोक्या सोबत झाली त्या नंतर दोघांनी  बाहेर आल्यावर मोटरसायकल करून वैजापूर ग्रामीण हददीत लूटमार केली. गुन्हे शाखेचे पीएसआय कल्याण शेळके यांना खबऱ्याने कुंदन शहरात आल्याची माहिती देताच त्याला अटक करण्यात आली पोलीस कर्मचारी रमाकांत पटारे, राजेंद्र सालूंके संदीप सानप यांनीही वरील कारवाईत भाग घेतला होता.

मुंबईचा आरोपी औरंगाबाद पोलिसांनी पकडला

औरंगाबाद- गोवन्डी परिसरात अल्पवयीन प्रेयसीच्या घरातून १२ तोळे सोने लंपास करणारा आरोपी गुन्हेशाखेने औरंगाबादेत पकडून गोंवडी पोलसांच्या हवाली केला. प्रफुल्ल रमेश जगताप (२१) रा. बीडबायपास असे अटक आरोपीचे नाव आहे. अनेक मैत्रिणी शी घरोबा करणारा प्रफुल्ल हा शहरात फिरत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना मिळाली होती आरोपी जगताप ने मुंबईतून सोने चोरल्यानन्तर त्याने ते एका मैत्रीणि मार्फत सोनाराकडे गहाण ठेवले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मुंबईतील गोवन्डी भागात मैत्रिणीच्या घरी सोने चोरल्यानन्तर बरेच दिवस मैत्रिणीने घरी या प्रकरणी माहिती दिली नव्हती दरम्यान  मुलीच्या आईला समजल्या नंतर त्यांनी गोवन्डी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. आरोपी जगताप चा शोध सुरु असतांना खबऱ्याने पीएसआय शेळके यांना माहिती दिली की, तो औरंगाबादेत फिरत आहे. त्यांनतर त्वरित कारवाई करत शेळके यांनी जगतापला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले वरील कारवाईत पोलीस  कर्मचारी रामाक्कांत पटारे, राजेंद्र साळुंके , नितीन देशमुख, संदीप सानप यांचा सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!