Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बनावट टायटन घड्याळांची विक्री करणारे दोन व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

औरंगाबाद – सिटीचौक परिसरातील झवेरी बाजार भागात असलेल्या टाईम इन ट्यून व भारत वाॅच अशा दोन दुकानांवर टायटन कंपनीच्या वतीने आज दुपारी १वा. धाडी टाकून २लाख २४हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख शाहेद मो.हफीस(२५) रा. अलंकार काॅलनी व ताहेर अब्दुल टकसाली (७१) रा.बुर्‍हाणी काॅलनी अशी ताब्यात घेतलेल्या व्यापार्‍यांची नावे आहेत.

टायटन कंपनीने एस.एन.जी. साॅलिसिटर या दिल्लीस्थित कंपनीला टायटन चे नाव वापरुन बोगस घड्याळे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या कंपनीचे अधिकारी गौरव तिवारी व कुंदनसिंग कहाटे(४५) यांनी सिटीचौक पोलिसांच्या मदतीने वरील कारवाई पार पाडली.या कारवाईत पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गांगुर्डे, पोलिस कर्मचारी नंद यांनी सहभाग घेतला होता. वृत्त हाती येई पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मंगळसूत्र चोरी, संशयित गुन्हेशाखेच्या ताब्यात

औरंगाबाद- सिडको उद्दं पुलाजवळ दुपारी १ वा, घरी परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र मोटरसायकलवर येऊन हिसकावणाऱ्या तिघांना गुन्हेशाखेने ताब्यात घेतले, या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे,

ललिता संजय खोंडे (३७) रा, कैलाशनगर असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या गळ्यातील २८ हजार रुचे गंठण चोरटयांनी हिसकावले वृत्त हाती येईपर्यँत गुन्हे शाखेने चोरटयांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली होती अशी माहिती एपीआय शेषराव खटा ने यांनी दिली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!