AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शहरात धुलिवंदन व शब्बेबारात सणांवर निर्बंध

औरंगाबाद – शुक्रवारी साजरा होणारे धुलिवंदन व दुसर्या दिवशी शब्बेबारात सण नागरिकांनी आपापल्या घरासमोर साजरे करावेत असे आदेश अप्परपोलिस महासंचालक डाॅ.निखील गुप्ता यांनी जारी केले आहेत अशी माहिती पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांनी दिली.
कोव्हिडमुळे शासनाने मिरवणूकांना अद्यापही परवानगी नाकारली आहे. नागरिकांनी काळजी घेत सामाजिक अंतर राखून सण साजरे करावेत असे उपायुक्तगिते म्हणाल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, चारचाची वाहनांच्या टपावर बसून फिरणे, ट्रिपलसीट फिरणे अशा कृती करणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल.शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी शहर शांत ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.