Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineCrisis : जाणून घ्या आतापर्यंत किती भारतीयांचे झाले मायदेशी आगमन ?

Spread the love

नवी दिल्ली  :  भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना तत्काळ खारकीव्ह शहर सोडण्याची ऍडव्हायजरी जाहीर केली आहे . रशियाचे युक्रेनवरील हल्ले चालूच असल्याने भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संपर्क केला आहे. सध्या  खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सहा तासांचा अवधी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे.  युक्रेनमधील काही भागात अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली असून हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन आणि मोदी यांच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.


अद्याप अनेक विद्यार्थी अडकले

आतापर्यंत आतापर्यंत 17,000 भारतीयांनी युक्रेन सोडल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत 3,352 भारतीय भारतात परतले आहेत. दरम्यान पुढील 24 तासांत 15 उड्डाणे नियोजित आहेत, त्यापैकी काही मार्गावर आहेत.देखील अडकले आहेत. यापैकी अनेक भारतीय हे युक्रेनच्या सीमाभागतून शेजारच्या राष्ट्रांमध्ये जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पण अद्यापही बरेच भारतीय विद्यार्थी आणि नागरीक या शहरांमध्ये अडकले आहेत. यापैकी एक म्हणजे खार्कीव्ह शहर. खार्कीव्ह शहरावर रशियन सैन्य कधीही ताबा घेऊ शकतं. तिथे कदाचित मोठा विध्वंस होऊ शकतो. पण त्याआधी भारतीय नागरिकांना तिथून दुसरीकडे वळवणं रशियाच्या दृष्टीकोनाने महत्त्वाचं ठरणार आहे. भारताच्या विनंतीनंतर अखेर रशियाने खार्कीव्हसाठी एक गोष्ट मान्य केली आहे. भारतीय नागरिकांनी तातडीने खार्कीव्ह सोडण्यासाठी रशियाकडून सहा तासांचा कालावधी देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी तातडीने खार्कीव्ह सोडावं असं आव्हान करण्यात आलं आहे.

रशियाला खार्कीव्ह शहरावर ताबा मिळवण्यास विलंब लावायचा नाही. त्यामुळे त्यांनी अखेर भारतीय नागरिकांसाठी सहा तासांचा वेळ दिला आहे. या सहा तासात भारतीयांनी तातडीने शहर सोडावं असं सांगण्यात आलं आहे. पण इतक्या कमी वेळात भारतीयांना बाहेर काढणं कठीण आहे. विशेष म्हणजे युक्रेनमधील भारतीय दुतावासाने सर्व भारतीयांना गाडी मिळत नसेल तर पायी चालत जाऊन शहर सोडण्याचं आवाहन केलं आहे. रशियन सैन्याने भारतीयांसाठी हल्ला करणं थांबवलं आहे. पण या तीन तासांच्या शांततेनंतर खार्कीव्हमध्ये काय घडेल याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही, असं बोललं जात आहे.

भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

दरम्यान, युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian student death in Russia-Ukraine war ) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रशिया-युरोप युद्धादरम्यान नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा खार्किव्ह शहरात मृत्यू झाल्याची दुखद बातमी काल समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. युक्रेनमध्ये अद्यापही शेकडो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.

युक्रेनमध्ये गोळीबारात चीनी नागरिक जखमी

दरम्यान चीनने बुधवारी सांगितले की, युक्रेनमधील गोळीबारात त्यांचा एक नागरिक जखमी झाला आहे, तर 2,500 चीनी नागरिकांना युद्धग्रस्त देशात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, 1 मार्च रोजी युक्रेनमध्ये झालेल्या चकमकीत एक चीनी नागरिक जखमी झाला होता. तो धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. युक्रेनमध्ये 6,000 हून अधिक चिनी नागरिक अडकले आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!