Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UP Election 2022 Updates : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी असे सुरु आहे मतदान…

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. या टप्प्यात पूर्व उत्तर प्रदेशातील अयोध्या, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, बहराइच, श्रावस्ती, गोंडा, अमेठी आणि रायबरेली या १२ जिल्ह्यांतील एकूण ६१ विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३४. ८ % मतदान झाले आहे, जे २०१७ च्या निवडणुकीपेक्षा २.९ % कमी आहे. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये, पूर्व यूपीच्या या प्रदेशात भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या, तर सपाने १५ आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या.

या टप्प्यातील आणखी एक सर्वाधिक चर्चेत असलेली जागा म्हणजे अमेठी, जी एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होती , येथेही आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरंक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे कि , जर तुम्ही आमचे सरकार बनवले तर होळी आणि दिवाळीला तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर दिले जाईल . तर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या ४ टप्प्यात सपा आणि बसपाचा सफाया झाला असल्याचे सांगून आमचे सरकार येण्याच्या आधी बुंदेलखंड, चंबळमध्ये गोळ्या, पिस्तूल आणि गोळ्या बनवल्या जायच्या तेथे आज विकास झाल्याचा दावा केला.

दरम्यान लोकांनी पाचव्या टप्प्यातही मतदानासाठी अनेक मतदान केंद्रावर दुपारनन्तर गर्दी केली असून यावेळी हे मतदान नेमके कोणाच्या पारड्यात जात आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. पुन्हा आपल्या हातात सत्ता राहावी म्हणून योगी सरकारबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने सर्व राज्यात आपला जोर लावला आहे. भाजपासाठी हि निवडणूक प्रतिष्टेची झाली आहे तर सपा नेते अखिलेश यादव आणि बसपानेही आपापल्या मतदार संघात भाजपकडून जागा पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!