Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नवाब मलिक यांची प्रकृती खालावली , रुग्णालयात दाखल

Spread the love

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त असून त्यांना सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते.


वैद्यकीय तपासणीनंतर नवाब मलिक यांना अर्ध्या तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांची प्रकृती खालावली. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. परंतु, नवाब मलिक यांना नेमका कसला त्रास होत आहे, हे समजू शकलेले नाही. न्यायालयाने यापूर्वीच नवाब मलिक यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करुन देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, ईडीच्या सूत्रांनुसार नवाब मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. नवाब मलिक हे चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते प्रश्नांची उत्तर देण्यात टाळाटाळ करतात, अशी ईडी अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचे समजते.पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यामुळे ३ मार्चपर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असतील. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता ईडी ३ मार्चला नवाब मलिक यांच्या कोठडीचा कालावधी आणखी वाढवून मागणार का, हे पाहावे लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!