AurangabadNewsUpdate : आपल्या स्ट्रेसला आपण स्वतःच जबाबदार असतो : मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे

औरंगाबाद : आपल्या स्ट्रेसला आपण स्वतः च शंभर टक्के जबाबदार असतो. असे प्रतिपादन डॉ. संदीप सिसोदे यांनी होल्डिंग हैंड्स बहुउद्देशीय संस्थेने ” स्ट्रेस ” या विषयावर ठेवलेल्या परिसंवादात केले. होल्डिंग हैंड्स बहुउद्देशीय संस्था औरंगाबाद ही राज्यभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी असलेले अनेक उपक्रम राबवित असते. तसेच अनेक सामाजिक विषयावर परिसंवाद व चर्चा घडवीत असते. सध्या मानसिक तणावाखाली बरीच लोकं आहेत. म्हणून या संस्थेने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांना घेऊन चर्चासत्र घडवून आणले.
आपल्या रोजच्या कामात अडथळा आला म्हणजेच स्ट्रेस येणे अशी व्याख्या करतानाच स्ट्रेस हा स्वतः कडून, इतरांकडून व भौगोलिक गोष्टी कडून येत असला तरी आपल्या स्ट्रेसला आपण स्वतःच जबाबदार असतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी या परिसंवादात बोलताना सांगितले. माणूस हा छोटे छोटे स्ट्रेस घेत असतो काही स्ट्रेस तर काहीच महत्वाची नसतात तरी देखील तो आपल्या सोबत ती २५, २५ वर्ष बाळगत असतो. यामुळे ते अनेक रोगांना बळी पडतात. वयोमान कमी होते. त्याच्या शरीरावर परिणाम दिसायला लागतात. पण इतर प्राण्यामध्ये हे होताना दिसत नाहीत कारण ते स्ट्रेस घेत नाहीत.
होल्डिंग हैंड्स बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिरसीकर यांनी प्रास्तविक केले, किरण वनगुजर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले तर रवींद्र बनकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिरसीकर, जिल्हाध्यक्ष वर्षा जैन, किरण वनगुजर, रवींद्र बनकर, मंगला महाजन, सुरेखा कलबुर्गे, उमेश डोंगरे, प्रमिला कुलकर्णी आणि इतर अनेक जन या परिसंवादात उपस्थित होते. या परिसंवादाचे अध्यक्ष स्थान मधुकर अण्णा वैद्य यांनी भूषविले.