MarathawadaNewsUpdate : लेव्ही साखरेच्या वसुली बाबत केलेल्या कारवाईचा अहवाल द्या : उच्च न्यायालय

नळदुर्ग : नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची लेव्हीं साखर दृष्टी उद्योग समूहाचे अशोक जगदाळे यांनी खुल्या बाजारात विक्री केल्याची कबुली दिलेली असताना वसुली संदर्भात कोणती कारवाई केली या बाबतचे म्हणणे मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना विचारणा केली असून १० मार्च पर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबत याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहिती नुसार कारखान्याची बिकट परस्थिती पहाता तुळजाभवानी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचे निश्चित झाल्यानंतर कायदेशीर बाबीची पूर्तता करून अशोक जगदाळे यांच्या दृष्टी उद्योग समूहाला सन २०१० ते २०१६ पर्यंत भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. मात्र त्यांनी या कारखान्यातून २ वर्षातच पळ काढला. हा पळ काढत असताना त्यांनी लेव्हीची साखर खुल्या बाजारात विक्री केली. मात्र त्या विक्रीतून आलेली रक्कम लेव्हीच्या बदल्यात जमा केली नाही.
सदरच्या विक्री केलेल्या साखरेची किंमत दंड v व्याजासह वसूल करावी म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे मागासर्गीय सदस्य सुनील बनसोडे यांनी जिल्हाधिकारी उस्मााबाद यांच्या कडे अर्ज सादर केला होता. त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी न घेतल्यामुळे अडव्होकेट निलेश पाटील यांच्या मार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पीटिशन दाखल केले होते. त्या अनुषंगाने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना रक्कम वसुली बाबत कोणती कारवाई केली या बाबतचे म्हणणे सादर करण्यासाठी १० मार्च पर्यंत मुदत दिली आहे.