Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : भीषण अपघातात नववधूसह ८ जण जागीच ठार , ५ जखमी

Spread the love

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रोडवर भीषण अपघात झालाय. या अपघातात नवरीसह ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये नवरीचाही समावेश आहे. सायंकाळी सात वाजता हि घटना घडल्याचे वृत्त आहे. उमरी येथील लग्नाचे वऱ्हाड हे हिमायतनगरहून मुंबईकडे जात असताना भोकर तालुक्यातील सोमठाणा ते राजवाडी पाटीदरम्यान हरिभाऊ ढाब्याजवळ ओव्हरटेक करताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.  जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.


अपघातग्रस्त  वऱ्हाडी हे उमरी तालुका जारीकोट या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. वऱ्हाडाच्या या टेम्पोला विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली आहे. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.प्राथमिक  माहितीनुसार, नववधुला घेऊन वर्हाडी मंडळी  साखरा ता. उमरखेड जिल्हा. यवतमाळ येथे जात असताना आज संध्याकाळी सहा ते सात  वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.  या भीषण अपघातात  दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात  नववधू पूजा पामनवाडसह, माधव सोपेवाड (30), दत्ता पामनवाड वधूचा भाऊ, सुनिल थोटे आदींचा मृत्यू झाला असून, सुनिता टोपलवाड, अभिनंदन कसबेसह पाच जण गंभीर जखमी झाले. धर्माबाद तालुक्यातील नवरदेव नागेश साहेबराव तमलवाड यांचा १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साखरा (ता. उमरखेड जिल्हा यवतमाळ) येथे वधूच्या माहेरी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर सायंकाळी वधू आणि वराकडील मंडळी जारिकोटला वराच्या गावी सासरी मुक्काम करुन परत आज मॅजिक गाडी क्रमांक (एम. एच. 29 ए. आर. 3214) ने नवरदेव-नवरीसह इतर नातेवाईक उमरी-भोकरमार्गे साखरा येथे जात असताना भोकरपासून जवळच असलेल्या सोमठाणा फाट्यासमोर टेम्पो क्रमांक (एम.एच 04-9955) ची समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!