Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : रिपब्लिकन ऐक्याविषयी मी आग्रही पण प्रकाश आंबेडकर यांना ऐक्य मान्य नाही : रामदास आठवले

Spread the love

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्य आम्हाला मान्य नाही ही भूमिका सोडली पाहिजे. मी नेहमीच ऐक्याचा विषय मांडलेला आहे,  त्यांना भेटण्याचीही आपली इच्छा आहे मात्र  प्रकाश आंबेडकर हे भेटण्यासाठी वेळ देतील असे वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचे  भले  होणार नाही, राजकारणात जिंकून येणे गरजेचे आहे,  प्रकाश आंबेडकर यांना आपल्या शुभेच्छा आहेत मात्र बाबासाहेबांनी सुरु केलेला रिपब्लिकन पक्ष अधिक व्यापक करण्याची गरज आहे. ‘एकच लक्ष रिपलिकन पक्ष’ असा निरा दिला पाहिजे, परंतु प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. 


रामदास आठवले दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने सुभेदारी विश्रामगृहावर  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोल्ट होते . आठवले जेंव्हा जेंव्हा औरंगाबादला येत तेंव्हा रिपब्लिकन ऐक्याच्या  मुद्द्यावर त्यांना विचारले जाते या प्रश्नाचे उत्तर देताना आठवले म्हणाले कि , प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्याविषयी गंभीर विचार केला पाहिजे. राजकारणात जिंकून येणे गरजेचे आहे, केवळ मत खाण्याच्या राजकारणात समाजाचे भले होणार नाही पण या विषयी ते गंभीर नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रशांत आठवले यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले कि , आमच्यावर नेहमी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून  मात्र केंद्रीय मंत्री नारायण  राणेंना महानगरपालिकेने घर बांधण्याची परवानगी देऊनही त्यांच्या घरी आज महानगरपालिकाचे लोक गेले. त्यामुळे राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का?, कंगना राणावत यांचे कार्यालय देखील असेच तोडण्यात आले होते, त्यामुळे सरकारची भूमिका कधीही सुडाची असू नये.

शिवसेना- भाजप एकत्र आले पाहिजेत

महाविकास गहिवर टीका करताना ते म्हणाले कि , सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकार कडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही त्यामुळे सरकार पाडण्याचे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. तसेच शिवसेना-भाजपचे भांडण मिटले पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, संजय राऊत यांना समज द्यावी, शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजेत , दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजप देखील तयार होईल, असेही आठवले म्हणाले. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता

दरम्यान पाच राज्यातील निवडणूक निकालावर भाष्य करताना आठवले म्हणाले कि , उत्तर प्रदेश मध्ये भाजपाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपला  पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावती यांचाच फक्त अधिकार नाही. ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे, दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखुरलेला  समाज एकवटण्याची गरज आहे. तसेच बसपाचा जनाधार कमी होत असल्याचेही  आठवले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!