AurangabadNewsUpdate : ऐतिहासिक क्रांती चौकात अखेर शिवराय झाले विराजमान , आता प्रतीक्षा लोकार्पणाची …

औरंगाबाद औरंगाबाद शहरच्या घालणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्या असा अश्वारूढ पुतळा अखेर क्रांती चौकातील चौथऱ्यावर विराजमान करण्यात आला. पुण्याहून विशेष खबरदारी घेत हा पुतळा रविवारी पहाटे शिवरायांचा हा पुतळा औरंगाबादेत आणण्यात आला होता. हा पुतळा बसविताना रहदारीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रात्रभर परिश्रम घेतल्यानंतर अखेर मंगळवारी पहाटे महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर बसवण्यात आला.
दरम्यान आज मंगळवारी २५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा पुतळा क्रेनच्या सहय्याने चौथऱ्यावर विराजमान झाल्याची माहिती मिळताच नागरिकांची क्रांतिचौकात गर्दी होत आहे. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील सर्वात उंच असा शिवरायांचा पुतळा असून त्याची उंची २१ फूट तर चौथऱ्याची उंची १० फूट इतकी असून पुतळ्याची एकूण उंची ३१ फूट एवढी आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला असून नव्या पुतळ्यासाठी १ कोटी रुपये खर्च आला आहे. या पुतळ्याचे एकूण वजन १० टन एवढे आहे.
औरंगाबादच्या ऐतिहासिक क्रांती चौकात पहिल्यांदा १९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते बसविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या ठिकाणी दुतर्फा उड्डाणपूल झाल्याने पुतळ्याची उंची कमी झाली होती. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी नवीन पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. शिवजयंतीच्या आधीच शहरात पुतळा नियोजित ठिकाणी विराजमान झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने आता पुतळा पुन्हा त्यावर आवरण टाकून झाकण्यात आला आहे.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शुभमुहूर्तावर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण कार्यक्रम व्हावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने पत्राद्वारे केली आहे.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी पहाटे विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी एसटी कॉलनी येथील ज्ञानेश विद्या मंदिर येथे शिवकुंज फाउंडेशन प्रणित रणझुंजार ढोलपथकाने आपली अदाकारी सादर केली.