AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन तरुणीचे लग्नाचे आमिष दाखवत शोषण , आरोपी अटकेत

औरंगाबाद – हर्सूल परिसरातील अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शोषण करणाऱ्या मजुराला मुकुंदवाडी पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक केली कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कृष्णा दत्तात्रेय भोजने(३३) रा. स्वराजनगर , मुकुंदवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २ ऑगस्ट २१ पासून आरोपी पिडीतेचे शोषण करत होता.पीडिता त्याच्या शेजारीच राहत होती त्यामुळे पीडितेच्या पालकांनी स्वराजनगरातून घर बदलत हर्सूल परिसरात वास्तव्य केले . तरीही आरोपीचा त्रास होत असल्यामुळे पीडितेच्या पालकांनी पीडितेला पोलसांना तक्रार देण्यास सांगताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलीस करता आहेत.