AurangabadCrimeUpdate : मालाबार गोल्ड मधून दीड लाखांची रत्नजडीत बांगडी लंपास

औरंगाबाद : जालनारोडवरील मालाबार गोल्ड शोरूम मधून हिरे आणि रत्नाने जडवलेली बांगडी पाहण्याचा बहाणा करत बुरखाधारी महिलेने१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वा. १ लाख ४२ हजार ५५५ रु. ची बांगडी लंपास केली. या प्रकरणी रविवारी दुपारी १ वा. जिनसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वरील प्रकार मालाबार गोल्ड चे मार्केटिंग प्रतिनिधी अशोक गायकवाड (२८) यांच्या रविवारी लक्षात आला, नववर्षानिमित्त शोरूम मध्ये केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळेस बुरखाधारीमहिला शोरूम मध्ये घुसली व मुझे जलदी जाना हे हिरे की चुडी दिखाव असे म्हणत रत्नजडीत बांगड्यां मधून एका बांगडी लंपास करून पळाली. याप्रकारच्या पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तांगडे पुढील तपास करत आहेत