AurangabadCrimeUpdate : मेहुणीशी प्रेम, जावायाला गंभीर दुखापत, तर जावायाकडून खुनाचा प्रयत्न , नवरा बायको अटकेत

औरंगाबाद : मेहुणीशी प्रेम संबंध प्रस्थापित झाल्यांनतर पत्नीला घर सोडायला सांगणाऱ्या जावायाला सासुरवाडीच्या लोकांनी ३१ डिसेंबर रोजी बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केली.म्हणून चिडलेल्या जावायाने बायकोसहित मेव्हण्यांवर चाकू हल्ला करत उट्टे काढले . या प्रकरणात जावायाने गंभीर दुखापत केल्याची तक्रार दिली तर बायकोने खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यामुळे दोन दिवसांनी रविवारी दुपारी परस्पर विरोधी गुन्हे उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. नवरा बायकोला अटक करून घाटी रुग्णालयात उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले आहेत.
रमेश शेषराव शिरसाठ(४५)रा. भारतनगर , आणि सत्यवती रमेश शिरसाठ (३८) रा. रमानगर अशी अटक आरोपीची नावे आहेत. रमेश हा मजुरी करतो गेल्या अनेक दिवसांपासून रमेश शिरसाठ याचे मेव्हणीशी प्रेम प्रकरण सुरु होते, त्यामुळे रमेश ची बायको सत्यवती व रमेश मध्ये नेहमी कडाक्याचे भांडण होत होते, म्हणून रमेश ने बायकोला घर खाली करून निघून जाण्यास सांगितले तर सत्यवती माहेरी निघून गेली व रमेशला मिसकॉल दिला. रमेशनेही ताबडतोब कॉल केला तेंव्हा सत्यवती ने फोन उचलला नाही. म्हणून रमेश च्या लक्षात आले बायको घर खाली ना करता माहेरी निघून गेली आहे. रमेशने ३१ डिसेंबर रोजी सासुरवाडीला जात बायकोला जाब विचारला तेंव्हा संतापलेल्या मेव्हण्याने लोखंडी पाईप घेत रमेश ला जबर मारहाण केली म्हणून रमेश ने चाकू काढत बायको व मेव्हण्याला चाकूने भोसकले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात उपचाराचातही दाखल केले, उपचारानंतर उस्मानपुरा पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी घेत गुन्हे दाखल करीत अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल सूर्यतळ करत आहेत.