CoronaMaharashtraUpdate : राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबई अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात 3 हजार 900 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबरोबरच राज्यात आज 85 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 252 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 99 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
दरम्यान राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु असून राज्यात आतापर्यंत 65 लाख 6 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 87 , 68, 760 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 2510 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महानगपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये 2510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत सात लाख 48 हजार 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.