AurangabadNewsUpdate : औरंगाबाद आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढली मोबाईलची अंत्ययात्रा

खोटे बोलणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निषेध .केबिन बाहेर शेकडो मोबाईल ठेऊन कर्मचारी परतल्या !
औरंगाबाद दि.२४: बंद पडलेल्या पॅनासॉनिक कंपनीचे लाखो खराब मोबाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याच्या निषेधार्थ आज आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने खोकडपूरा येथील आयटक कार्यालयापासून ते जिल्हापरिषदेपर्यंत मोबाईलची अंत्ययात्रा काढण्यात आली. यासाठी सजवण्यात आलेल्या तिरडीवर मोबाईल संच ठेऊन,त्याला हार घालून दुपारी एक वाजता अंत्ययात्रा सुरू झाली.
‘राम नाम सत है’ म्हणत त्या मोबाईलला अखेरचा निरोप देत होत्या.काही जणी ‘हमारा मोबाईल अमर रहे’ असेही म्हणत होत्या.तिरडीवरील ठिकठिकाणी मोबाईलवर फुले उधळीत होत्या व आपल्या पदराने वारेही घालत होत्या. अंत्य यात्रेमध्ये सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
जिल्हा परिषद आवारात झाली शोक सभा
‘सर्व मोबाईल संच स्वीकारण्यात येतील व ते दुरूस्तीला दिले जातील’ असे आश्वासन जिल्हा परिषद, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरखले यांनी काल आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन ते आज विसरले व एकेक मोबाईल संच घेतो असे सांगितले.याचा आयटकने तीव्र निषेध केला व प्रचंड घोषणाबाजी करत मिरखलेच्या केबिनकडे धाव घेतली तेंव्हा पोलिसांसोबत हुज्जत झाली.त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने कांहीं कर्मचारी केबिनकडे धावल्या व सर्व मोबाईल केबिनजवळ ठेऊन टाकले व त्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. यावेळीही पोलिसांशी प्रचंड धक्काबुक्की झाली. शेवटी शेकडो मयत मोबाईलना श्रध्दांजली वाहण्यासाठी सुमारे १ तास शोकसभा घेण्यात आली.
आंदोलन होणार अधिक तीव्र
यावेळी शन्नो शेख,मीरा अडसरे, शालिनी पगारे,माया भिवसाने, ज्योती गायकवाड,अभय टाकसाळ,तारा बनसोडे,राम बाहेती यांची श्क्षध्दांजलीपर भाषणे झाली. मोबाईल ची तब्येत बिग घडवणाऱ्या व खराब मोबाईलचा पुरवठा करणाऱ्या शासन व प्रशासनाचे धोरण कारणीभूत असल्याची टीका यावेळी वक्त्यांनी केली. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या कृती समितीच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले “मोबाईल वापसी” आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न होत असल्याच्या व कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर मुख्य सेविका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी करीत आहेत परंतु या दहशतीला न जुमानता याचा मुकाबला करा व आंदोलन तीव्र करा असे आवाहन यावेळी आयटकने केले.
अधिकाऱ्यांचे आश्वासन
मोबाईल नसतानाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पतीच्या मोबाईल वरून किंवा मुलांच्या मोबाईल वरून नातेवाईकांच्या मोबाईलवरून कामे करण्याची सक्ती केली जात आहे.डॅशबोर्डवर एन्ट्री करण्याचे काम सांगितले जात आहे. डॅश बोर्ड वर एन्ट्री करण्याची सक्ती आता कर्मचाऱ्यांना केली जाणार नाही असे लेखी आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले यांनी दिले. गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू असून तालुका कार्यालयात आज पर्यंत १००० मोबाईल जमा करण्यात आले आहेत तसेच आज मोबाईल ची अंत्ययात्रा काढून जिल्हा परिषदेला सुमारे चारशे मोबाईल जमा करण्यात आले आहे यानंतरही उर्वरित मोबाईल संच तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
भोईवाडा प्रकल्पाचे सीडीपीओ इंदोलेचा तीव्र निषेध
ग्रामीण भागात तील मोबाईल संच त्याच्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वीकारलेले असतानाही औरंगाबाद शहरातील नागरी प्रकल्पात पैकी भोईवाडा येथील प्रकल्प चे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री इंगोले यांच्या कार्यालयात गेल्या पंधरा दिवसात शेकडो कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून मोबाईल परत देण्यासाठी गेले होते मात्र त्यांनी ते मोबाइल स्वीकारले नव्हते व महिलांशी असभ्य भाषेत हे वर्तन करत होते याचा आज तीव्र निषेध करण्यात आला ‘इंदोले मुर्दाबाद” इंदोलेका फंड नही चलेगा’, ‘इंदोले ,फिंदोले नहीं चलेगा’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या शेकडो मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषदेतून आपला मोर्चा भोईवाडा कडे वळवला व तेथे अंत्ययात्रा नेण्याचे जाहीर केले.तेंव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून भोईवाडा येथील प्रकल्पाचे अधिकारी श्री .इंदोले यांनाच परिषदेत पाचारण केले व कर्मचाऱ्यांनी भोई वाड्यात जाण्याऐवजी जिल्हा परिषदेतच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या मांडला. दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे त्यानंतर कधीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची असे यावेळी जाहीर करण्यात आले. आज आज झालेल्या अंत्ययात्रा व मोर्चा साठी शन्नो शेख, विलास शेंगुळे, उषा शेळके,कविता वाहुळे,विकास गायकवाड, राजू हिवाळे अनिता पावडे, मुनीरा शेख,गीता पांडे,अलका सोलट ,प्रमिला शिंदे, सीमा व्यवहारे,नीता खडसन, विमल वाडेकर,कांता पानसरे,तमीज शेख,अलका डिडोरे,प्रतिभा ढगे,आदींनी परिश्रम घेतले.