AurangabadNewsUpdate : अज्ञात वाहनाच्या धडकेत अल्पवयीन मुलगा ठार, दोन जखमी

औरंगाबाद – गुरुवारी मध्यरात्री जळगाव रोडवरील जकातनाक्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १६वर्षाच्या मुलाचा अंत झाला.तर दोघे जखमी झाले.या प्रकरणी आज दुपारी १२.३०वा. हर्सूल पोलिस ठाण्यात प्राणांतिक अपघाताचा गुन्हा वाहन चालका विरुध्द दाखल झाला आहे. गोपाळ कचरु सुदाम(१६) असे मयताचे नाव असून प्रताप आणि ज्ञानेश्वर कांबळे अशी जखमींची नावे आहेत.या प्रकरणी मयताचे वडील सुदाम कचरुतुपे (५२) रा.म्हसोबानगर हर्सूल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चव्हाण करंत आहेत