Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात ४१ हजार ९६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Spread the love

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे देशातील एकूण कोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान, या एका दिवसातील नव्या करोना रुग्णांचा आकडा हा करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आहे.

आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता थेट ४ लाख ३९ हजार २० वर पोहोचला आहे. त्यामुळे, निश्चितच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

केरळमध्ये रुग्णांची वाढती संख्या

दरम्यान केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग चिंताजनक प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, देशात २४ तासांत नोंद झालेल्या ४१ हजार ९६५ नव्या कोरोनाबाधितांपैकी ३० हजार २०३ रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. तर या एका दिवसांतील ४६० मृत्यूंपैकी ११५ मृत्यू केरळमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर महाराष्ट्रात मंगळवारी (३१ ऑगस्ट) ४ हजार १९६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच एका दिवसात राज्यात १०४ करोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० करोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्क्यावर पोहोचला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!