AurangabadNewsUpdate : औरंगाबादेत बोगस लसीकरण !! बेगमपुरापोलिसांकडे तक्रार

औरंगाबाद : शनिवारी शासनाच्या कोव्हिड लसीकरणाच्या वेबपोर्टलवर शहरातून १६ नावाची लसीकरण केल्याची बोगस एंट्री झाल्याची तक्रार महापालिकेने बेगमपुरा पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी ही तक्रार सायबर पोलिस ठाण्याकडे पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो असे बेगमपुरा पोलिसांनी महापालिकेला सांगितल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.
शहरातील एका परिसरातील महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार घडला.महापालिकेच्या मुख्य इमारतीतील डाटा आॅपरेटरच्या हा प्रकार लक्षात आला.त्याने घडलेला प्रकार डाॅ.पाडळकरांच्या कानावर घातल्यानंतर डाॅ.पाडळकरांनी मनपाआयुक्तांशी सल्लामसलत करुन बेगमपुरा पोलिसांकडे तक्रार दिली.तसेच घडलेला प्रकार राज्याच्या आरोग्यमंत्रालयाला कळवण्यात आला आहे.दरम्यान महापालिकेचा वैद्यकीय विभागाकडून बौगस एंट्री झालेलय नावांच्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.त्या नावाचा पत्ता, फोन क्रमांक अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे डाॅ.पाडळकरांनी सांगितले.