Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KabulBombBlastUpdate : सुधारित : “त्या ” आत्मघातकी हल्ल्यात ६० ठार १४० जखमी , हल्लेखोरांना सोडणार नाही : बायडेन

Spread the love

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत १५ नव्हे तर ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष जोबायडेन यांनी आत्मघातकी हल्लेखोरांना आम्ही सोडणार नसल्याचा इशारा देत रात्री व्हाईट हाऊसमधून काबुल हल्ल्यात शाहिद झालेल्या सैनिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करीत आमच्या शाहिद हिरोंचा आम्हाला अभिमान असून त्यांचे बलिदान वाया जाणार नाही असे सांगितले: ते पुढे म्हणाले कि , “आम्ही आमचे ध्येय पूर्ण करू, आणि आमचे सैन्य माघारी गेल्यानंतरही आम्ही अमेरिकन नागरिकांच्या बचावाचे कार्य सुरू ठेवू, ज्याद्वारे आम्ही अफगाणिस्तानातून बाहेर पडू इच्छित असलेल्या प्रत्येक अमेरिकनला शोधू. आणि आम्ही त्यांना बाहेर काढू.”

यावेळी बोलताना बायडेन म्हणाले कि , काबूल बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार असलेल्या इसिसशी संबंधित संघटनेला “आम्ही कधीही क्षमा करणार नाही. विसरणार नाही. आम्ही तुमची नक्की शिकार करू ज्याची किंमत तुम्हला चुकवावी लागेल”

या बाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत १२ अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध असून अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागात हा हल्ला झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!