Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPolitcalUpdate : भाजपला आगामी निवडणुकीत रोखण्याचा विरोधी पक्षाचा संकल्प

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आजच्या व्हर्च्युअल बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले. काँग्रेससह १९ विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी या वर्चुअल बैठकीला उपस्थिती लावली होती.

आपआपसातील मतभेद विसरून २०२४ मध्ये सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनातही विरोधकांची एकजूट असेल. तसेच संसदेबाहेरही लढा दिला जाईल, असे सोनिया गांधी यांनी त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस नेते एक अँटनी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीएमके प्रमुख स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची उपस्थिती होती. मात्र उत्तर प्रदेशात प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने या बैठकीला दांडी मारली. तर मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने या बैठकीपासून दूर राहिल्या.

“अंतिम लक्ष्य २०२४ लोकसभा निवडणूक आहे. यासाठी रणनिती आखावी लागेल. तरच देशाला स्वातंत्र्य आंदोलनाची मूल्य आणि संविधानाच्या सिद्धांतावर आधारीत सरकार देऊ शकू. आपल्यासाठी एक आव्हान आहे, मात्र आपण सर्व एकत्रितपणे त्याचा सामना करू. एकत्र येण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्या सर्वांच्या काहीतरी अडचणी आहेत. पण देशहितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस आपल्या भूमिकेत कुठेही कमी पडणार नाही”, असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!