Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : समृद्धी महामार्गावर ट्र्क अपघातात १२ ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने महामार्गाचे काम सुरू असून दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण १५ मजूर होते आणि त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!