AurangabadNewsUpdate: औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील रखडलेल्या ३८१ कर्मचा-यांच्या बदल्या

संलग्न कर्मचा-यांचाही नंबर लागणार
औरंगाबाद : दोन वर्षांपासून कोरोना काळात रखडलेल्या बदल्यांना प्राथमिकता देत पोलिस आयुक्तालयातील कर्मचा-यांच्या बदल्या बुधवारी केल्याची माहिती पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दिली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार ५ वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन गेलेल्या एकूण कर्मचार्यांपैकी १५ टक्के कर्मचार्यांच्या बदल्या प्राधान्याने केल्या आहेत. तर काही कर्मचारी विशेष कारणासाठी संलग्न केले आहेत.कधी त्यांच्या मागणी नुसार तर कधी प्रशासकीय गरजेनुसार कर्मचारी संलग्न केले आहेत.त्यांच्याही बदल्या परत त्याजागी करण्याचे आदेश दिलेले आहेत.पण ते संलग्न कर्मचार्याची गरज आणि मागणीतील गांभीर्य पाहून त्यावर निर्णय घेतला जाईलअसा खुलासा डॉ . गुप्ता यांनी यावेळी केला. या बदल्यांमुळे काही कर्मचा-यांमध्ये खुशी तर काहींमध्ये दु:खाचे वातावरण आहे. .
शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेत आणि मुख्यालयातील कर्मचा-यांची मुदत संपली होती. ३८१ कर्मचा-यांमध्ये ४३ सहायक फौजदार, १०३ जमादार, ८३ पोलीस नाईक आणि १५२ पोलीस शिपायांचा समावेश आहे.
………
मर्जीतील अनेक कर्मचारी ठाण मांडून……..
शहरातील १७ पोलीस ठाण्यात अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. यातील काही कर्मचा-यांवर हप्ता वसूलीचे आरोपही झाले आहेत. त्यामुळे कायमच वादग्रस्त राहिलेल्या त्या पोलीस ठाण्यांकडे आयुक्तांनी आता लक्ष केंद्रित केलेले आहे. प्रत्येक संलग्न कर्मचार्याचे रेकाॅर्ड तपासले जात आहे.
………
ठराविक कामातील तज्ज्ञांची आवश्यकता….
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदल्यांसंदर्भात महत्त्वपुर्ण सूचना अधिका-यांना केली होती. ते म्हणाले होते की, एखादा कर्मचारी ठराविक कामात तज्ज्ञ असेल तर त्याला संलग्न किंवा त्याच कामासाठी त्याची नियुक्ती व्हावी. त्यामुळे पोलीस दलाला त्याच्या कामाच्या अनुभवाचा फायदा होईल. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता बोटावर मोजण्या इतके तज्ज्ञ कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येतात.