Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला दीड वर्षांनी पुन्हा कोरोना !!

Spread the love

तिरुवनंतपुरम :  भारतातील सर्वात पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे . देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला होतो तो केरळात . या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आता पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थीनी जानेवारी, २०२० च्य शेवटच्या आठवड्यात भारतात परतली होती.


दरम्यान चीनहून भारतात परतलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी भारतातील पहिली कोरोना रुग्ण होती. तिला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. तिची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आहे पण आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मात्र तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, असे  थ्रिसूरची डीएमओ डॉ. के. जे, रिना यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

पहिल्यांदा तिला ३० जानेवारी, २०२०रोजी  कोरोना झाल्याचे  निदान झाले होते.  त्यानंतर तिच्यावर थ्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर जवळपास तीन आठवडे उपचार झाले होते . या उपचारानंतर तिचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर २० फेब्रुवारी,२०२० ला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र  आता जवळपास दीड वर्षांनंतर तिला पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!