Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येत नवीन रुग्णांपेक्षा दुप्पट वाढ

Spread the love

मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासात ६ हजार २७० नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १३ हजार ७५८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ९४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,३३,२१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात १ लाख १८ हजार ३१३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे व सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२४,३९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!