AurangabadNewsUpdate : कौटुंबिक कलहातून २० वर्ष घर सोडून राहिलेल्या वृध्देला केले कुटुंबाच्या हवाली

दामिनी पथकाची कौतुकास्पद कामगिरी
औरंगाबाद – घरातील किरकोळ वादातून दुखावलेल्या महिलेला दामिनी पथकाने तिच्या कुटुंबाच्या हवाली केले.भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी या कामी महत्वाची भूमीका बजावली असून पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दामिनी पथकाचे कौतूक केले आहे.
सबेरा बेगम (७०) वर्षे रा.मिसारवाडी या गस्तीवर असलेल्या दामिनी पथकाला बेशुध्दा अवस्थेत ११जून रोजी सापडल्या. त्यांना शुध्दीवर आणल्यानंतर त्यांनी लग्नानंतर काही वर्षांनी पती सोडून गेले व पुढे त्यांचे निधन झाल्यामुळे सबेरा बेगम सैरभैर झाल्या होत्या. घरात सुनेशी पटंत नसल्यामुळे वैतागून त्या २०००साली घरातून बाहेर पडल्या. कधी मोलमजूरी करुन तर
कधी अन्नदान सुरु असलेल्या ठिकाणी पोट भरंत त्याजगंत होत्या.
हा सर्व घटनाक्रम उघडकीस आल्यावर पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी सबेरा बेगम यांच्या मुलांना जावायाला बोलावून घेत तोंडी समंज देत सबेरा बेगम यांना कुटुंबियांच्या हवाली केले. वरील कारवाईत फेमुनिसा शेख,निर्मला निंभोरे, प्रियंका सरसांडे,प्राप्ती साठे या महिला पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.