Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : काय आहे आजची राज्यातील करोनाची आजची स्थिती ?

Spread the love

मुंबई:  गेल्या २४ तासांत ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ८ हजार १०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यात आज कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक राहिली.  दरम्यान मृतांचा आकडाही वाढला असून आज ४०६ रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात आतापर्यंत या संसर्गाने १ लाख ६ हजार ३६७ जणांचा बळी घेतला आहे.

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या प्रमुख शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या मोठी असल्याने व पॉझिटिव्हिटी दरही जास्त असल्याने चिंता कायम आहे. राज्यात आज मृत्यूंचा आकडाही वाढून ४०६ वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेपुढे याबाबतचे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राज्यातील करोना रिकव्हरी रेट गेल्या काही दिवसांपासून ९५ टक्क्यांवर जाऊन काहीसा स्थिरावला आहे.
– राज्यात आज ४०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८१ टक्के एवढा.
– आज राज्यात ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ५६,१६,८५७ रुग्णांनी करोनावर केली मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४% एवढे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७६,११,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,८७,८५३ (१५.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात १०,०४,७७० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर ६,०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १ लाख ६१ हजार ७०४ इतकी असून त्यात सर्वाधिक २० हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर मुंबई महापालिका क्षेत्रात हा आकडा १७ हजार ९३१ इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतीच असून सध्या १६ हजार ९४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ८१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप खोटा

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार करोनाविषयीची, विशेषत: मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रोज जाहीर केली जाणारी आकडेवारी कशी तयार केली जाते, हे सांगतानाच आरोग्य विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही आकडेवारीची लपवालपवी होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

अशी  होते रुग्णसंख्या, मृत्यूंची नोंद?

– केंद्र सरकार कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टलचा वापर करते. १) आयसीएमआरचे सीव्ही अॅनालिटिक्स पोर्टल (बाधित रुग्णांसाठी) आणि कोविन १९ पोर्टल (मृतांच्या आकड्यांसाठी). या शिवाय प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.

-प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आरटीपीसीआर ॲपद्वारे आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवर भरत असते.

-राज्यातील दैनंदिन आकडेवारी तयार करण्यासाठी रोज रात्री १२ वाजेपर्यंतची बाधित रुग्णांची यादी आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवरुन तर मृत्यूची यादी कोविड १९ पोर्टलवरून राज्य आणि जिल्हास्तरावर डाउनलोड करण्यात येते.

-यातून राज्य आणि जिल्हा स्तरावर दुहेरी नोंदी असलेले रुग्ण वगळण्यात येतात. साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खातरजमा केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची अंतिम माहिती राज्य कार्यालयास प्राप्त होते. या माहितीच्या आधारेच राज्याचा अंतिम अहवाल आणि प्रेस नोट तयार केली जाते.

– रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी केली जाते. यात दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!