Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत वाढ

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासांत आज १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११ हजार ४४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. मागील आठवड्याभरात दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या आसपास आढळत होती. मात्र आज या आकड्यात वाढ झाली आहे.

राज्यात सध्या १ लाख ६० हजार ६९३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आजपर्यंत ५८ लाख ७६ हजार ८७ नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील ५६ लाख ८ हजार ७५३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र १ लाख ३ हजार ७४८ जणांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत १८ हजार १५७, ठाण्यात १५ हजार ९७५, रायगडमध्ये ४ हजार ८४२, रत्नागिरीत ६ हजार ६०९, सिंधुदुर्गात ५ हजार ९१०, पुण्यात १९ हजार ५२१, साताऱ्यात १० हजार ६३४, सांगलीत १० हजार ०७०, कोल्हापूरमध्ये १७ हजार ३७०, नागपूरमध्ये ७ हजार १६८, सोलापुरात ४ हजार ३८५, नाशिक ६ हजार २९४, अहमदनगर ४ हजार ९५५, जळगाव २ हजार ९१० आणि बीडमध्ये ३ हजार ४२७ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून ३९३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे १ लाख ३ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत दिवसभरात ६६० रुग्णांची नोंद

मुंबईत आज दिवसभरात ६६० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत नवे करोनाबाधित सापडण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्याचवेळी दुसरीकडे आज दिवसभरात ७६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत मुंबईत एकूण ६ लाख ८१ हजार २८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आज दिवसभरात २२ रुग्णांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार १२२ इतका झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!