AurangabadNewsUpdate : गुन्हेगाराला शोधणाऱ्या पोलिसांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या लाडक्या ” लुफी”ला अवघ्या ४ तासात शोधले !!

औरंगाबाद : अशक्य ते शक्य !! करण्यात पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे पोलीसअधिकारी घनश्याम सोनवणे यांचा नेहमीच हातखंडा आहे. नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी घनश्याम सोनवणे नेहमीच चर्चेत असतात . यावेळी तर त्यांनी उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे “यांचा लॅब्रो डाॅग ‘लुफी ‘ याचा अवघ्या चार तासांत शोधण्याची कामगिरी करून ते सूत्रवे कुटुंबियांच्याही कौतुकास पात्र ठरले आहे.
त्याचे झाले असे कि, सहकार नगर एन -५ सिडको येथे काल दिनांक ४ जून रोजी शुक्रवार सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांचा लॅब्रो डाॅग अचानकपणे गायब , दिसेनासा झाला ,त्यांनी ताबडतोब एन -७ सिडको पोलीस स्टेशन ला जाऊन रितसर तक्रार दाखल केली ,नंतर घरी आल्यावर त्यांनी CCTV फुटेज बघीतले असता एका मोटारसायकल बाईक ,टु व्हीलर वर बसुन तीघे जण आल्याचे दिसले त्यातला एक जण व्यक्ती खाली उतरला व डाॅगी लुफी ला कसले तरी आमीष दिले असावे त्यामुळे, सदर व्यक्तीने त्याला उचलुन घेत बाईक वर बसवून चोरून नेले असल्याचे कळाले. दरम्यान तक्रार दिल्यानंतरही त्यांनी ही खुप शोधाशोध केली परंतु डाॅगी लुफी मिळुन आला नाही
दुसऱ्या दिवशी ही सकाळ पासूनच त्यांनी शोध सुरु केला. नोकरी दरम्यान घनश्याम सोनवणे यांचा परीचय असल्याने सुत्रावे मॅडम यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी दुपारी दिड वाजता घरी जाऊन पाहणी करुन CCTV फुटेज आधारे ,गुप्त बातमीदार मार्फत ,शोध केला आणि अवघ्या चार तासांत “डाॅगी लुफी”चा शोध लावला व पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला मॅडम ला बोलावून घेतले तेंव्हा समोर लुफी ला बघून सुत्रावे परिवारास आनंदाश्रू अनावर झाले. अशक्य ते शक्य चॅलेंजिंग काम केले असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यातही उत्साहाचे आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांनी फोनवर पोलीस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता तसेच पोलीस उपायुक्त मिना मकवाना यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. अशा रीतीने “लुफी ” च्या तपासासाठी घनश्याम सोनवणे यांच्यासह त्यांचे कर्मचारी शिवाजी गायकवाड,रमेश सांगळे,अजय कांबळे, ईमरान अथर, बाळाराम चौरे आदींनी परिश्रम घेतले .