Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUnlockCurrentUpdate : मोठी बातमी : दिलासादायक : औरंगाबादसह राज्यातील १८ जिल्हे शुक्रवारपासून लॉकडाऊन मुक्त

Spread the love

मुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येत असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यामध्ये  मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणीसह १८ जिल्ह्यांचा समावेश आहे समावेश आहे.


दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसेच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.


अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार


पहिल्या टप्प्यात १८  जिल्हे,
दुसर्‍या टप्प्यात ५ जिल्हे : दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार हे सहा जिल्हे निर्बंधमुक्त होतील.
तिसरा १० जिल्हे : तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूरचा समावेश आहे. तर, पुणे व रायगड या जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात अनलॉक होईल.
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे


राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे


पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार
तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन


याबाबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलवली होती. या बैठकीत कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने  पाच लेव्हलमध्ये अनलॉक आणि लॉकडाऊनचा प्लान तयार करून लॉकडाउनचे निर्बंध आणखी शिथील केले जात आहेत.

नव्या निर्णयानुसार  लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरजिल्हा प्रवेशाला मुभा असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांची चार पातळ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पातळीमधील जिल्ह्यांमध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला आहे.

हे १८ जिल्हे झाले पूर्णतः अनलॉक

शुक्रवारपासून औरंगाबाद , बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, नांदेड, ठाणे, वर्धा, यवतमाळ, भंडारा, लातूर, नागपूर, वाशिम, गोंदिया, गडचिरोली दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यातील लॉक डाऊन पूर्णपणे उठविण्यात येत आहे. . राज्यात ३० मे रोजी लॉकडाऊनबाबतचे नवीन नियम जाहीर करण्यात आले होते. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येतील असे सांगण्यात आले होते . त्यानुसार ही सवलत देण्यात आली आहे.

अशी आहे अनलॉक योजना

५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. “सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असे वडेट्टीवार म्हणाले.

अशी असेल जिल्ह्यांची वर्गवारी!

पहिला गट : पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा गट : दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसरा गट : तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.

चौथा गट : चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.

पाचवा गट : पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!